Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9881938249
gpainwadi1992@gmail.com
PIN: 415101

भौगोलिक माहिती

स्थानिकता

ऐनवाडी / धनगरवाडी हे गाव कोल्हापूर रत्नागिरी महामार्गापासून १० किमी अंतरावर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. तसेच तालुक्याच्या मुख्यालया पासून १३ किमी अंतरावर आहे. गांव हे वाड्या वस्तीचे आहे.

भौगोलिक संरचना

ऐनवाडी धनगरवाडी च्या पूर्व व दक्षिण बाजूस मौजे माण गावाची हद्द व उत्तरेस मौजे कासार्डे गावाची हद्द असून हे ठिकाण पश्चिमेस मौजे मानोली गावाची हद्द समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ८०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी धनगरवाडी हे गाव घाटमाथ्यावरील भाग असून, येथे अतिवृष्टी क्षेत्रात समावेश होतो. ऐनवाडी धनगरवाडी मध्ये वार्षिक सरासरी ३,००० मिमी ते ४,००० मिमी (३००-४०० सेमी) पेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडतो. हा परिसर दक्षिण कोल्हापुरातील पश्चिम भागात असल्याने येथे अतिवृष्टी होते ऐनवाडी धनगरवाडी मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

ऐनवाडी मधील प्रमुख व्यवसाय शेती व पशू पालन हा व्यवसाय आहे

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

ऐनवाडी च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

ऐनवाडी मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात. मौजे धनगरवाडी येथे स्वयंभू महादेवचे पांडव कालीन ऐतिहासिक मंदिर आहे