ऐतिहासिक माहिती

इतिहास आणि बदल

मौजे धनगरवाडी येथे स्वयंभू महादेवचे पांडव कालीन ऐतिहासिक मंदिर आहे गावापासुन शिवकालीन ऐतिहासिक पावनखिंड ४ KM आहे तसेच विशाळगड किल्ला ११ व्या-१२ व्या शतकाच्या सुमारास कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज (दुसरा) याने बांधला असून तो मौजे ऐनवाडी धनगरवाडी पासून सुमारे १५ KM आहे प्राचीन/मध्ययुगीन उल्लेख कमी असून, ऐनवाडी हा परिसर परंपरागतरीत्या शेतीवर अवलंबून होता. आसपासच्या भागात ऐतिहासिकदृष्ट्या मराठा-काळापासून नागरी व ग्रामस्थ जीवनाचा रुज दिसतो.

ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन

ग्रामपंचायत ऐनवाडी धनगरवाडी ची स्थापना दी १२/१०/१९९२ रोजी झाली असून सर्व ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होत आहेत.

लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे

ऐनवाडी ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात. ऐनवाडी / धनगरवाडी हे गाव कोल्हापूर रत्नागिरी महामार्गापासून १० किमी अंतरावर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. तसेच तालुक्याच्या मुख्यालया पासून १३ किमी अंतरावर आहे. गांव हे वाड्या वस्तीचे आहे. २०११ च्या जनगणने नुसार ऐनवाडी / धनगरवाडी गावाची एकूण लोकसंख्या ९७७ आहे यामध्ये पुरुष संख्या ४९४ व स्त्रिया संख्या ४८३ आहे एकूण कुटुंब संख्या १७३ आहे १ ) ऐनवाडी गावाची एकूण लोकसंख्या ६६५ आहे यामध्ये पुरुष संख्या ३३५ व स्त्रिया संख्या ३३० आहे एकूण कुटुंब संख्या ११३ आहे २ ) धनगरवाडी गावाची एकूण लोकसंख्या ३१२ पुरुष संख्या १५९ व स्त्रिया संख्या १५३ आहे एकून कुटुंब संख्या ६० कुटुंब आहेत.

शिक्षण आणि संस्था

ऐनवाडी मध्ये जिल्हा परिषद प्रा शाळा १ ली ८ वी प्रर्यंत असून अंगणवाडी आहे तसेच धनगरवाडी मध्ये जिल्हा परिषद प्रा शाळा १ ते ४ थी व अंगणवाडी आहे

आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क

ऐनवाडी धनगरवाडी मध्ये ST सुविधा उपलब्ध आहे तसेच गंभीर आजारचे प्रमाण नगण्य आहे प्राथमिक आरोग्य केंद्र माण येथील वैदकीय अधिकारी यांचे मार्फत दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी लसीकरण सुविधा उपलब्ध आहे गावातील पशूधन यांची आरोग्य सुविधा साठी दर महिन्याच्या पहिला गुरुवार पशू वैदकीय अधिकारी मलकापुर यांचे मार्फत तपासणी व उपचार केले जातात

धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव

गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू , मुस्लीम , बौद्ध , हरिजन , धनगर सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सर्व धर्मियांचे सण एकत्र साजरे केले जातात.